Sunday, 10 April 2016

चैत्र

चैत्र

भवताल ...
बदलत असतो नियमितपणे
त्याचा असा एक ताल आहे
ते चक्र अव्याहत चालू असत
ते रूप बदलतं ....अगदी आश्चर्यकारकरित्या...
मला जेंव्हा हा बदल जाणवतो ,तेंव्हा काय जाणवतं... तर...या भवतालचा रंग पालटतो.. आकारात बदल जाणवतात...भवतालच्या लँडस्केप चा मूड बदललेला दिसतो...दृश्य एकच ,पण ...आषाढ श्रावणातली कलरस्किम आणि चैत्र वैशाखातली त्याची कलर स्किम यातले होणारे बदल किती टोकाचे असतात...
श्रावणातली ते तरल नजाकतभरं लँडस्केप चैत्र वैशाखात किती स्तब्ध ,तटस्थ भासू लागतं... झाडं, गवत , आकाश, ढग यांचे रंग ,आकार त्या अव्याहतपणे बदलत जाणाऱ्या ऋतूचक्राशी बांधिल राहून आपलं अस्तित्व दाखवत असतात... त्या त्या ऋतू मधलं बदलणारं  लँडस्केप दरवेळी प्रचंड इंटरेस्टिंग वाटतं..
हे चित्र म्हणजे असाच एक तुकडा आहे भवतालच्या लँडस्केप मधला...
चैत्रातल्या एका स्तब्ध क्षणाचं चित्रं आहे हे...
हॉट कलर्स मध्ये रंगलेली एक बंदिश ...
तो झळाळता गुलमोहर...
ते दुरवरचं शांत गाव , त्यातली घरं..
तो शुभ्र घुमट ...दर्गाह असणार..
हा माहौल , हि रंगांची बंदिश बदलत राहणार..
दरवेळी अशीच भुलवत राहणार ....
त्यांची चित्रं होत राहणार...


अन्वर.

No comments:

Post a Comment

स्केच बुक

कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...