Tuesday, 21 December 2021
डाळिंबं..
सकाळी गावात गेलो होतो. फिरून परत घराकडे येताना वाटेत बाजाराच्या बाहेर नेहमीचे फळवाले होतेच. त्यांच्याकडे नेहमीच लक्ष जात असतं, आज पण गेलंच. बाजाराचा दिवस असल्यानं वेगवेगळी भरपूर फळ आलेली दिसली. एका फळवाल्याकडे डाळिंबं खूप दिसली आणि अगदी रसरशीत होती. ती डाळींबं अक्षरशः काही वेळ बघत थांबलो. लाल रंगाच्या भुलवून टाकणाऱ्या अफाट छटा बघत राहिलो. घरी आलो तरी ते रंग ती रसरशीत डाळींबं डोक्यातून जाईनात. मग दुपारी पुन्हा जाऊन ती डाळींबं घेऊनचं आलो..खोलीतल्या टेबलावर ठेवून दिली समोरच.रंगानी किती मोहक असावं...सारखं तिकडं लक्ष जात राहिलं. खिडकीतून येणारा प्रकाश बदलत जाईल तसे रंग बदलत निघाले होते..प्रकाशाशी रंगांचा तो चाललेला खेळ डोळ्यांमधून मग प्यालेट पर्यंत आणि तिथून कॅनव्हास वर उतरलाच शेवटी...
Subscribe to:
Posts (Atom)
स्केच बुक
कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...
-
# 1 मंडई च्या परिसरामध्ये फिरतोय, प्रचंड गर्दीने वेढलंय इमारतीला... व्यापारी ,भाजी विक्रेते, भाजी खरेदी करणारे , फळविक्रेते , फळ...
-
रस्त्याच्या दोन्हीकडे लांबवर पसरलेलं लँडस्केप बघत निवांत निघालो होतो.रस्त्यावर जवळपास एकटाच दिसत होतो मी. वाहनं ही फ...
-
चैत्र भवताल ... बदलत असतो नियमितपणे त्याचा असा एक ताल आहे ते चक्र अव्याहत चालू असत ते रूप बदलतं ....अगदी आश्चर्यकारकरित्या... मला जे...