कॉलेजच्या दिवसांमध्ये बऱ्याच वेळा या ठिकाणी आम्ही लँडस्केप करायला जायचो. शहरापासून थोड्याच अंतरावर ,सांगली मिरज रोडवर हे ठिकाण आहे . त्यावेळी हा परिसर अतिशय शांत असायचा. मस्त जुनीपुराणी झाडं... पायवाटा...आणि मला हे ठिकाण आवडायचं खरं कारण म्हणजे इथली घरं... ब्रिटिश काळात हा परिसर वसलेला असल्याने त्या काळची ती घरं ,या सर्व परिसरात अनेक आहेत , आणि अजूनही बऱ्या अवस्थेत आहेत. हि घरं अतिशय सुकूनभरी वाटतात..झाडीत लपलेली ...पायवाटेनी रस्त्याला जोडलेली...ऐसपैस व्हरांडा असलेली ...कौलारू घरं.. अशा घरांची कितीतरी चित्र स्केचेस तेंव्हा केलेली..
परवा मिरजेकडे जाताना इथं जावंसं फार वाटलं...
मुख्य रस्ता सोडला आणि गेलोच तिथं ...
बराच बदल झालाय ...पण अजूनही काही घरं ,झाडं आहेत जाग्यावर....
एक स्केच केलं ...
पुन्हा एकदा कधीतरी यायला पाहिजे इझल कलर कॅनव्हास घेऊन...
Sunday, 10 April 2016
पुन्हा एकदा ....
चैत्र
चैत्र
भवताल ...
बदलत असतो नियमितपणे
त्याचा असा एक ताल आहे
ते चक्र अव्याहत चालू असत
ते रूप बदलतं ....अगदी आश्चर्यकारकरित्या...
मला जेंव्हा हा बदल जाणवतो ,तेंव्हा काय जाणवतं... तर...या भवतालचा रंग पालटतो.. आकारात बदल जाणवतात...भवतालच्या लँडस्केप चा मूड बदललेला दिसतो...दृश्य एकच ,पण ...आषाढ श्रावणातली कलरस्किम आणि चैत्र वैशाखातली त्याची कलर स्किम यातले होणारे बदल किती टोकाचे असतात...
श्रावणातली ते तरल नजाकतभरं लँडस्केप चैत्र वैशाखात किती स्तब्ध ,तटस्थ भासू लागतं... झाडं, गवत , आकाश, ढग यांचे रंग ,आकार त्या अव्याहतपणे बदलत जाणाऱ्या ऋतूचक्राशी बांधिल राहून आपलं अस्तित्व दाखवत असतात... त्या त्या ऋतू मधलं बदलणारं लँडस्केप दरवेळी प्रचंड इंटरेस्टिंग वाटतं..
हे चित्र म्हणजे असाच एक तुकडा आहे भवतालच्या लँडस्केप मधला...
चैत्रातल्या एका स्तब्ध क्षणाचं चित्रं आहे हे...
हॉट कलर्स मध्ये रंगलेली एक बंदिश ...
तो झळाळता गुलमोहर...
ते दुरवरचं शांत गाव , त्यातली घरं..
तो शुभ्र घुमट ...दर्गाह असणार..
हा माहौल , हि रंगांची बंदिश बदलत राहणार..
दरवेळी अशीच भुलवत राहणार ....
त्यांची चित्रं होत राहणार...
अन्वर.

Subscribe to:
Posts (Atom)
स्केच बुक
कॉलेजमध्ये असताना स्केचबुक असायचं जवळ. त्यात स्केचेस करायचो कधी कधी. शिक्षकांनी सांगितलेलं असायचं, उद्या येताना दहा स्केचेस पाहिजेत. मग कॉले...
-
# 1 मंडई च्या परिसरामध्ये फिरतोय, प्रचंड गर्दीने वेढलंय इमारतीला... व्यापारी ,भाजी विक्रेते, भाजी खरेदी करणारे , फळविक्रेते , फळ...
-
रस्त्याच्या दोन्हीकडे लांबवर पसरलेलं लँडस्केप बघत निवांत निघालो होतो.रस्त्यावर जवळपास एकटाच दिसत होतो मी. वाहनं ही फ...
-
चैत्र भवताल ... बदलत असतो नियमितपणे त्याचा असा एक ताल आहे ते चक्र अव्याहत चालू असत ते रूप बदलतं ....अगदी आश्चर्यकारकरित्या... मला जे...